---Advertisement---

Crime News : ट्यूशन टीचरची स्कूटर, विद्यार्थ्याचा मृत्यू, एक पत्र अन् …; असा रचला कुशाग्रच्या हत्येचा कट

---Advertisement---

Crime News : उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली होती. येथे दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. मुलाचा मृतदेह त्याच्या ट्युशन टिचरच्या घरात सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस तपास करत होते.

आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. दहावीचा विद्यार्थी कुशाग्रच्या हत्येप्रकरणी त्याच्या ट्यूशन टीचरला अटक करण्यात आली आहे. ट्यूशन टीचर रचितासह पोलिसांनी तिचा प्रियकर प्रभात आणि एका साथीदारालाही अटक केली आहे.

आता त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रचिताने ७ वर्ष ज्याला शिकवले त्याच विद्यार्थ्याची हत्या केली. मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा कुशाग्रच्या घरून तिला चांगली फी मिळायची. त्यातून तिने एक स्कूटर देखील खरेदी केली होती.

याच स्कूटरमुळे आता मोठा उलघडा झाला आहे. या हत्येनंतर कुशाग्रच्या घरी ३० लाख रुपयांच्या खंडणीचे पत्र पाठवण्याची योजना त्यांनी आखली. त्यासाठी रचिताने तिची स्कूटर प्रभातला दिली.

प्रभात आपल्या मित्रासह कुशाग्रच्या इमारतीखाली पोहोचला तेव्हा त्याला तिथे गार्ड राजेंद्र दिसले. त्यांनी गार्डला खंडणीचे पत्र दिले. ते कुशाग्राच्या घरी पोहोचवण्यास सांगितले.

असे असताना गार्डला संशय आला. त्याने ती स्कूटर ओळखली आणि तिचा नंबर लिहून घेतला होता. गार्डने कुशाग्रचे मामा अभिषेक अग्रवाल यांना स्कूटरबाबत सांगितल्यावर त्यांनी रचिताला फोन केला. त्याने रचिताला स्कूटरबद्दल विचारले असता तिने स्कूटर तिच्या मित्राकडे असल्याचे सांगितले.

यावर मामांनी विचारले की तुझा मित्र कुठे आहे? तिथेच कुटुंबीयांचा संशय बळावला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी चौकशी करताच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---