Cyrus Poonawalla : मोठी बातमी! सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका…, रूग्णालयातून मोठी अपडेट आली समोर

Cyrus Poonawalla : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या लस निर्मिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुबी हॉल क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रांट यांनी सांगितले की, सायरस पूनावाला यांची प्रकृती आता स्थिर होत आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.

त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. रुग्णालयाचे सल्लागार अली दारूवाला यांनी सांगितले की, डॉ. सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. शुक्रवारी सकाळी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.

डॉ. परवेझ ग्रांट, डॉ. मॅकले आणि डॉ. अभिजीत खर्डेकर यांच्या देखरेखीखाली डॉ. पूनावाला यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रूबी हॉल क्लिनिककडून या संबंधित एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे.

त्यामध्ये म्हटलं आहे की, सायरस पूनावाला यांना 16 नोव्हेंबर 2023 रोजी हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याने त्यांना रुबी हॉल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. ते लवकर बरे होत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल.

डॉ. पुनावाला यांची तब्येत सध्या चांगली आहे. दरम्यान, सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या (Forbes) 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला हे सहाव्या क्रमांकावर आहे.

1966 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. सीरम दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस तयार करते. हे डोस जगभर जात असतात.