दादा तु कुठयं, आवाज दे, बहिणीना आवाज दिला पण तोपर्यंत खूप उशीर झाला, लग्नाच्या ४ दिवसातच तरुणाचा शेवट…

छत्रपती संभाजीनगरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. चार दिवसापूर्वी लग्न झालेल्या तरुणावर काळाने झडप घातली. विहिरीवर पाणी मारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना याठिकाणी घडली आहे.

सोमनाथ साहेबराव इधाटे (वय 23 रा.शेलगाव खुर्द ता. फुलंब्री) असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शेलगाव खुर्द येथे सोमीनाथ साहेबराव इधाटे हा आपल्या आई-वडिलांसह राहत होता. चार दिवस लग्न करून झाल्यानंतर शुक्रवारी सत्यनारायणची पूजा घरी आयोजित केली होती.

पूजा झाल्यानंतर सोमनाथ इधाटे यांचे आई वडील व पत्नी दुसऱ्या गावी नातेवाईकांच्या एका विवाहाला गेले होते. त्यानंतर सायंकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीला नव्याने सिमेंट कडाचे काम करण्यात आले. या कडावर पाणी मारण्यासाठी सोमनाथ इधाटे हा गेला होता.

दरम्यान, तेव्हा विद्युत मोटर बंद करण्यासाठी बहिणीला आवाज देणार असे सांगितले होते. मात्र उशीर झाला तरी तो आला नाही. यामुळे बहीण विहिरीच्या आसपास पाहायला गेली. तिथे कोणीही दिसून आले नाही. यामुळे ती घाबरली.

तिने आरडाओरोड केला. तेव्हा परिसरातील नागरिक आल्यानंतर त्यांना ही घटना लक्षात आली. या विहिरीत बघितल्यानंतर रात्री बारा वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी कुटूंबियांनी एकच हंबरडा फोडला.

वडोद पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर सदरील मृतदेह हा फुलंब्री येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. नंतर शेलगाव खुर्द येथे राहत्या घराच्या परिसरात शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.