समुद्राजवळ सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह; डोक्यावर, भुवयांवर केस नाही, CCTV तून मोठी माहिती उघड

रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दापोलीमध्ये असलेल्या एका बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून ती तरुणी काम करत होती. दाभोळ समुद्रकिनारी तिचा मृतदेह आढळून आला आहे.

त्या तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पण अजूनही त्याबाबत पोलिस तपास करत आहे. चार पाच दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दापोली पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती.

ओमळी या गावी जात आहे, असे सांगून २४ वर्षीय निलिमा सुधाकर चव्हाण ही घरून निघाली होती. त्यानंतर तिच्याशी संपर्क होत नसल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपास करत असताना पोलिसांनी तिचा मृतदेह सापडला आहे.

पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण तिच्या कुटुंबियांना तिच्या मृत्यूबाबत संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशीची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यानुसार आता पोलिस तपास करत आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती चिपळूनच्या एसटी बसमध्ये बसल्याचे समोर आले होते. त्यावेळी तिच्याबरोबर एक तरुणीही होती. त्या दोघीपण खेडला उतरल्या होत्या. तर तिथे एक तरुणही त्यांना भेटला.

तो तरुण आणि ती तरुणी निलिमाला का भेटले? याची माहिती पोलिस घेत आहे. पोलिसांना निलिमा भेटली तेव्हा तिच्या डोक्यावर आणि भुवयांवर केस नव्हते. ते पाहता संशय आणखी वाढला होता. त्यामुळे पोलिस त्या तरुणाचा आणि तरुणीचा तपास करत आहे.

हा विषय चिपळूनचे आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात मांडला होता. त्यानंतर याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आता पोलिस तपासातून काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.