भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यात येत असलेल्या जैतपूर येथे एक दुःखद घटना घडली आहे. याठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिराला सुरक्षा म्हणून लोखंडी गेट लावण्यात येत आहे. या गेटचे काम सुरु असताना मजुराला विजेचा झटका बसला. यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.
कामावर घटनेतील मृत चंद्रशेखर मजूर म्हणून मजुरी काम करीत होता. मजुरी काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने चंद्रशेखर जखमी झाला. चंद्रशेखरला तात्काळ लाखांदूरयेथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी चंद्रशेखरला तपासून मृत घोषित केले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांसह गावकऱ्यांना मिळाली.
नंतर लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चंद्रशेखर खुशाल कुत्तरमारे (वय ३५) असे मृत मजुराचे नाव आहे. जैतपूर येथे गजानन महाराजाचे मंदिर आहे. याठिकाणी हे काम सुरू होते. याठिकाणी नेमकी कशामुळे ही घटना घडली, याबाबत माहिती मिळाली नाही.
या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी गेट लावण्याचे काम सुरू होते. यावेळी कामाचा अंदाज न आल्याने नजरचुकीने ही घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याची चौकशी सुरू आहे. याबाबत कोणाची चूक असल्यास कारवाई केली जाईल.