अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकाचा मृत्यू, भयंकर माहिती आली समोर…

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर काल दुपारी काही मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. यामध्ये जय मालोकार नावाच्या तरुणाचा समावेश होता. घटनेनंतर या जय मालोकार याला राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं होते. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

असे असताना मात्र त्याचा मृत्यू झाला. जय मालोकर याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जय मालोकार हा मनसे कार्यकर्ता आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती.

यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. अमोल मिटकरी अकोल्यात विश्रामगृहात होते, तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली होती. यावेळी चांगलाच राडा झाला होता. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या राड्यानंतर जय मालोकरला अस्वस्थ वाटू लागले होते.

यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. आता मनसे आणि राष्ट्रवादीत यामुळे जोरदार टीका सुरू झाली आहे. त्याच्या छातीत अचानक दुखू लागले होतं, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जय मालोकार याला हृदय विकाराचा झटका येईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. पण जय मालोकारला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात त्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी अजित पवारांवर देखील टीका केली आहे.

त्याला रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा त्याचे इसीजी काढण्यात आले होते. त्याला हृदय विकाराचा मोठा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने एन्जोग्रॉफीसाठी आयसीयूत नेलं गेलं. मात्र त्याचे आधीच निधन झाले. यावर अजून अजित पवार आणि राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली नाही.