मुंबईतील मुलुंडमधील बालराजेश्वर मंदिरात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील मंदिरात असलेल्या पंख्यात विद्युत प्रवाह उतरला. यामुळे या तरुणाचे निधन झाले आहे.
याठिकाणी भजन सुरू होते. भजनाच्या कार्यक्रमानंतर ही घटना घडली आहे. निमेश भरत भिंडे असे या तरुणाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, भजन कार्यक्रमानंतर मंदिरातील फरशी पुसत असताना निमेश पंखा बाजूला करायला गेला आणि त्याला विजेचा धक्का बसला.
तो मंदिरात सेवा देण्यासाठी गेला होता. वीणा नगरात महादेव टेलिकॉम नावाने त्याचे मोबाईल दुकान आहे. स्विचबोर्डला लावलेला पंखा बाजूला करताना निमेश जमिनीवर कोसळला. त्याला विजेचा शॉक लागला होता. त्यामुळे तो खाली पडला. तिथे असलेला शिवम मदतीला धावला. मात्र त्याला देखील शॉक लागला, मात्र तो थोडक्यात बचावला.
दरम्यान, मोबाईलच्या दुकानातील काम संपल्यानंतर निमेश दररोज मंदिरात जायचा. तिथे तो सेवा द्यायचा. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा हा शिरस्ता होता. यामुळे तो अनेकांच्या परिचयाचा झाला होता.
त्याच्या जाण्याने आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुक्तीधाम स्मशानभूमीत कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आले. या घटनेने परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. निमेशचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे पुढे आले आहे. पण कोणाच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडल्याचे पुरावे मिळाल्यास योग्य कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.