बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या एनडी स्टुडिओमध्येच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे संपुर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नितीन देसाई हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. त्यांनी लगान, हम दिल दे चुके सनम, जोधा अकबरसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे सेट डिझाईन केले होते. ते मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीहून मुंबईला आले होते. त्यानंतर ते अडीजला थेट कर्जतच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये गेले होते.
जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी काही व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केलेल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी चार बिझनेसमनची नावे घेतली आहे. रात्री उशिरा स्टुडिओमध्ये आल्यानंतर त्यांनी मॅनेजरकडून व्हॉईस रेकॉर्डर घेतले होते. तुला उद्या सकाळी मी हे देतो, असे नितीन देसाई मॅनेजरला म्हटले होते.
सकाळी जेव्हा मॅनेजर व्हॉईस रेकॉर्डर घेण्यासाठी तिथे आला तेव्हा नितीन देसाई मृत अवस्थेत पडलेले होते. तो व्हॉईस रेकॉर्डरही त्यांच्या बाजूलाच होता. मॅनेजरने तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तो व्हॉईस रेकॉर्डर ताब्यात घेतला होता.
पोलिसांनी तो व्हॉईस रेकॉर्डर तपासला असता त्याच्यामध्ये काही व्हॉईस नोट्स पोलिसांना भेटल्या आहे. त्यामध्ये चार बिझनेसमन लोकांची नावे त्यांनी घेतली आहे. ते आपल्यावर कसा दबाव टाकत आहे, याबाबत नितीन देसाई यांनी सांगितले आहे.
ज्या चार बिझनेसमनची नावे त्यांच्या व्हॉईस नोट्समध्ये आहे. त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. तपास केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. दिल्लीहून येत असतानाच त्यांनी जीवन संपवण्याचा विचार करुन ठेवला होता, असा संशय सुद्धा पोलिसांनी व्यक्त केला आहे.