सध्या चित्रपटगृहात सुभेदार चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समोर तगडे चित्रपट असताना देखील याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांनी जल्लोष करत चित्रपट आवडला असल्याच्या भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचून आणताना दिसला.
सध्या गदर २ आणि ओएमजी २ सारखे बॉलिवूडचे दोन तगडे चित्रपट स्पर्धेमध्ये असतानाही सुभेदार चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. हा चित्रपट अगोदर १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर त्यात बदल करण्यात आला. सुभेदार चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.
राज्यात ३५० हून अधिक चित्रपट गृहात ९०० पेक्षा अधिक स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. सध्या या चित्रपटाने मोठी कमाई केल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत चित्रपटाने शुक्रवारी पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १.०५ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला.
तसेच शनिवारीमुळे हा आकडा वाढलेला पाहायला मिळाला. शनिवारी चित्रपटाने तब्बल १.७५ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला. तसेच रविवारी देखील अनेकांनी हा चित्रपट बघितला. या दोन दिवसांत सुभेदार चित्रपटाने एकूण २ कोटी ८० लाखांची कमाई करत केली.
हा चित्रपट चित्रपट बनवण्यासाठी १० कोटींचा खर्च आला आहे. यामुळे लवकरच हा चित्रपट पैसे वसूल करेल. दरम्यान, गदर २ चित्रपटाचे तगडे आव्हान समोर असतानाही सुभेदार या ऐतिहासिक चित्रपटाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गदर २ चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर ५७५ कोटींचा आकडा पार केला आहे. या रेसमध्ये हा चित्रपट टिकून आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठी प्रेक्षकांकडून चित्रपटांना मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून सुभेदार चे कलाकार आभार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, यामध्ये अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, अनिकेत बांदल, आस्ताद काळे, मृण्मयी देशपांडे यांनी चांगले काम केले आहे. भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली आहे. यामुळे हा चित्रपट अजून कमाई करेल.