मतदान केलेलं बोटं कापलंय, यापुढे एक-एक अवयव…; न्यायासाठी भावाचं धक्कादायक कृत्य, ठाण्यातील घटना

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आमदाराच्या पीएच्या त्रासाला कंटाळून जीव दिला होता. पण त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्यांच्या भावाने कॅमेऱ्यासमोरच आपले बोट कापून घेतले आहे.

त्याचा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. नंदकुमार नंनावरे यांनी त्यांच्या पत्नीसह २० दिवसांपूर्वी जीव दिला होता. या घटनेला अंबरनाथचे आमदार बालाणी किणीकर यांचा पीए जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला होता.

ननावरे दाम्पत्य हे त्यांच्या त्रासाला कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. साताऱ्यातील काही लोक आपल्याला त्रास देताय असे सांगत ननावरे यांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता. त्यानंतर भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

आता या घटनेला २० दिवस झाले असून आरोपींपैकी कोणालाही अटक न झाल्यामुळे नंदकुमार यांचे भाऊ धनंजय नंनावरे संतापले आहे. त्यामुळे त्यांनी थेट त्यांचे बोट कापून घेतले आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

मी माझे बोट कापून सरकारला पाठवले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत शरीराचा एक-एक भाग कापून सरकारला तो पाठवत राहीन. ज्या बोटाने मोदी सरकारला मी मतदान केलं होतं. तेच बोट मी कापत आहे, असे धनंजय नंनावरे यांनी म्हटले आहे.

धनंजय नंनावरे यांनी याचा एक व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. तो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी लगेचच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे पीए शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम, तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांच्यासोबतच आणखी २-३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नंदकुमार नंवावरे हे उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारमध्ये राहायचे. २० दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन जीव दिला होता. काही दिवसांनंतर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये त्यांनी काही लोकांनी नावे घेतली होती. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण जीव देत असल्याचे त्यांनी म्हटले होते.