Dharmaveer : ठाण्याच्या टेंभीनाक्यावर आरमाडा गाडी थांबली, ‘आनंद दिघे’ बाहेर पडताच सगळेच अवाक झाले अन्…

Dharmaveer : ठाणे आणि आनंद दिघे हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बघायला मिळते. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे हे एक आगळ वेगळं व्यक्तिमत्त्व होत. त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘धर्मवीर’ चिञपटाच्या तुफान यशानंतर आता ‘धर्मवीर भाग २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

याच्या चिञीकरणाची सुरवात ठाण्यात करण्यात आली. या अनुषंगाने टेंभीनाका येथील नवराञोत्सवात आनंद दिघे अष्टमीला आरती करायचे. हा सीन आनंद दिघे यांची भूमिका करणार्‍या प्रसाद ओक व इतर कलाकारांच्या उपस्थितीत शूट करण्यात आला.

यामुळे हे चित्रीकरण सुरू असताना उपस्थित देवी भक्तांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला. यामुळे सगळेच अवाक झाले होते. आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना कशी वाढवली, मराठी माणसाला कसे लढायला शिकवले, हे त्या चित्रपटात दाखवले.

यामुळे हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला होता. आता धर्मवीर २ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. अभिनेता प्रसाद ओक याने दिघे यांच्या वेशात गर्दीतून एन्ट्री केली. याची कल्पना कोणालाही नव्हती. यामुळे सगळेच शांत राहिले.

दरम्यान, याठिकाणी दिघे यांच्या हस्ते होणार्‍या अष्टमीच्या आरतीची आठवण ठाणेकर आजही सांगतात. तोच प्रसंग प्रसाद ओक यांनी जिवंत करत दिघे यांच्या आनंदाश्रमातून दिघे यांच्याच ‘आरमाडा’ गाडीतून टेंभी नाक्यावर एन्ट्री घेतली. यामुळे सगळं चित्र पुन्हा एकदा समोर आले.