---Advertisement---

Dhirendra Shastri : जमीर शेख झाले शिवराम आर्य! म्हणाले मी कृष्णभक्त, धीरेंद्र शास्त्रींच्या उपस्थितीत हिंदू धर्म स्वीकारला..

---Advertisement---

Dhirendra Shastri : नगरमधील बंजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून जमीर शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दहा जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

धर्मांतर केल्यानंतर आता त्यांचे नाव ‘शिवराम आर्य’ झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव सीता आर्य तर मुलगा बलराम आणि कृष्णा असे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जमीर शेख नगरमध्ये राहतात. ते मोलमजुरी करतात. त्यांच्या कुटूंबात आधीपासूनच हिंदू देव-देवतांची पूजा आराधना केली जाते. यामुळे त्यांना आधीपासून धर्माबाबत प्रेम आहे. त्यांची हिंदू धर्मावर त्यांची श्रद्धा आहे.

त्यांनी आपल्या मुलींचे विवाह देखील हिंदू पद्धतीने करून दिले आहेत. आम्ही कुटुंबीय इच्छेने हिंदू धर्मात दाखल झालो असून यासाठी कोणाचाही दबाव नाही, असे त्यांनी सांगितले. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी अनेक दिवसांपासून आपली इच्छा बोलून दाखवली होती.

याबाबत बजरंग दलाचे नगरचे अध्यक्ष कुणाल भंडारी म्हणाले की, सहा ते सात महिने शेख यांच्यासोबत राहून त्यांच्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेतली. त्यांनी याबाबत अनेकदा इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांची इच्छा पूर्ण केली.

त्यांची प्रबळ इच्छा लक्षात घेऊन त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे घेऊन आलो, असे त्यांनी सांगितले आहे. असे असले तरी मुस्लिम धर्मींयांनी जमीर शेख पूर्वीपासूनच आमच्या धर्मात फारसे मिसळत नव्हते, असे म्हटले आहे.

तसेच त्यांचा कल आणि वागणेही हिंदू धर्माप्रमाणेच होते. ते हिंदूत्वादी संघटनांचे पदाधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेख ९ लेकरांचे वडील आहेत. त्यांना नातवंडे देखील आहेत. त्यांनी सांगितलं की, आपल्या बहिणीने सुद्धा हिंदू धर्म स्वीकारला आहे.

दरम्यान, आपली पत्नी हिंदू असून ती वंजारी समाजाची आहे, असे त्यांनी सांगितले. शेख यांच्या निर्णयाचे हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करीत असून सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---