Dhule news : वडील सोडून गेले, आईने दुसरे लग्न केले, 11 वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल, वाचून डोळे पाणावतील…

Dhule news : वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने दुसरे लग्न केले. याची सल मनात ठेवून साक्री तालुक्यातील आमळी येथील आश्रम शाळेत शिकत असलेल्या अकरा वर्षीय मुलाने टोकाचे पाउल उचलत आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

अनिल कोमशा पाडवी असे आत्महत्या केलेल्या पाचवीतील विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तो धुळे जिल्ह्यातील असून, काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलाचे निधन झाले होते. नंतर त्याच्या आईने दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या पतीसोबत निघून गेली.

यामुळे अनिल पाडवी आणि त्याची बहीण आमळी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. अचानक त्याचा रात्रीच्या सुमारास शाळेतील शौचालयाजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. यामुळे मुलांनी याबाबत माहिती दिल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

असे असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषणा केले आहे. अनिल पाडवी हा विद्यार्थी गेल्या वर्षी चौथीपासून या शाळेत होता. त्याची सावत्र बहीणदेखील याच शाळेत पाचवीत आहे. लहान वयात त्याने हा। निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रात्री उशिरा खाली असलेल्या शौचालयाजवळ लोखंडी अँगलला त्याने नायलॉन दोरीने गळफास  घेतल्याचे समोर आले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे आश्रमशाळेत शोककळा पसरली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.