Dhule News: धुळ्यातील महिला अधिकाऱ्याच्या मुलाचा धक्कादायक प्रताप, हॉस्टेलमधील मुलींना रात्री…; घटनेने उडाली खळबळ

Dhule News: धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी पिंपळनेरमधील आदिवासी मुलींच्या हॉस्टेल प्रशासनाचा धक्कादायक प्रकार आदिवासी संघटनांनी समोर आणला आहे. येथे मुलींच्या हॉस्टेलमधील महिला अधिकारीच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉस्टेलमधील मुलींना चक्क रात्रीच्या वेळी हॉटेल अँड बारमध्ये नेण्यात आले आहे.

यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे मुलींच्या हॉस्टेलमधील महिला पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. याबाबत आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी कार्यक्रमासाठी रात्रीच्या वेळी मुलींना हॉटेल अँड बारमध्ये नेण्यात आले आहे.

दरम्यान, आता मुलींच्या हॉस्टेल बाहेर आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होत आंदोलन सुरु केले आहे. याबाबत महिला अधिकारीच्या निलंबनाच्या मागणीसाठी आदिवासी संघटनातर्फे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

तसेच आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेराव घातला. सध्या याबाबत हॉस्टेलच्या प्रशासनाकडून या घटनेवर बोलण्यास कोणी समोर आलेले नाही. याबाबत तपास सुरू आहे.

तसेच घटनेबाबत हॉटेल प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. धुळ्यातील साक्रीत ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील आदिवासी मुलींच्या हॉस्टेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉस्टेलमधील हा धक्कादायक प्रकार आदिवासी संघटनांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या घटनेने तालुक्यातील पिंपळनेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.