राज्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. मॉरिसची पत्नी सरीना यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या लेकीने तिचे वडील गमावले आहेत. त्याबद्दल मला वाईट वाटते.
पण तितकंच दु:ख मला अभिषेक घोसाळकरांच्या मुलांबद्दलही वाटतं. मॉरिस परफेक्ट नव्हता. पण सोशल मीडियावर आता त्याचे चित्र रंगवले जातंय, तसा तो व्हिलनही नव्हता, एखाद्याला कोणी इतकाही त्रास देऊ नये त्याचे परिणाम वेदनादायी होतील, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मॉरिस नोरोन्हा याने ज्या अंगरक्षाकाच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. त्याने त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचे पिस्तुल वापरले होते. मिश्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिश्रा त्याच्याकडे असलेले पिस्तुल मॉरिसच्या कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवायचा. त्याची डुप्लिकेट चावी मॉरिसने तयार करुन घेतली होती, पोलीस चौकशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी मॉरिसची पत्नी सरीनाचा जबाब काल नोंदवला. त्यातूनही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी त्यानं महत्त्वाच्या पक्षांकडून तिकिट मिळतंय का याची चाचपणी केली. पण बलात्काराचा आरोप असल्याने कोणताही पक्ष त्याला तिकिट देण्यास तयार नव्हता.
बलात्कारासह मॉरिसवर आणखी दोन केसेस होत्या. मॉरिसच्या मनात अभिषेक यांच्याबद्दल राग होता. त्याला सूड घ्यायचा होता, अशी माहिती तिनं पोलिसांना दिली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे.