---Advertisement---

वर्ल्डकपआधीच क्रिकेटविश्वात भूकंप! फिक्सींग प्रकरणी ११ जण निलंबीत, ३ भारतायांचाही समावेश

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने 2021 मध्ये UAE मध्ये खेळल्या गेलेल्या एमिरेट्स T10 लीगमध्ये 3 भारतीयांव्यतिरिक्त 8 लोक आणि काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत ज्या भारतीयांची नावे समाविष्ट आहेत, त्यापैकी 2 लोक संघाचे मालक आहेत. याशिवाय बांगलादेश संघाचा माजी खेळाडू नासिर हुसैन याचेही नाव या यादीत आहे. या लीगमध्ये खेळणाऱ्या पुणे डेव्हिल्स संघाचे पराग संघवी आणि कृष्ण कुमार यांचे नाव आहे.

हे दोघेही संघाचे सहमालक आहेत. याशिवाय तिसरा भारतीय सनी धिल्लॉन आहे. जो फलंदाजी प्रशिक्षक आहे. या सर्वांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याबरोबरच, आयसीसीने सांगितले की हे आरोप 2021 मध्ये अबूधाबी टी 10 लीगशी संबंधित आहेत आणि त्या स्पर्धेतील सामने फिक्स करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आयसीसीने या स्पर्धेसाठी ECB ला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी (DACO) म्हणून नियुक्त केले होते. त्यांच्या वतीने हे आरोप जारी केले जात आहेत. संघवीवर सामन्याचे निकाल आणि इतर गोष्टींवर सट्टा लावण्याचा आणि तपासात एजन्सीला सहकार्य न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फलंदाजी प्रशिक्षक सनी धिल्लनवर सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याशिवाय कृष्ण कुमार यांच्यावर DACO पासून तथ्य लपवल्याचा आरोप आहे. प्रत्येकाला उत्तर दाखल करण्यासाठी १९ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

या यादीत समाविष्ट असलेला बांगलादेश संघाचा माजी खेळाडू नसीर हुसेनवर भेटवस्तू मिळाल्याबद्दल DACO ला माहिती न दिल्याचा आरोप आहे. याशिवाय फलंदाजी प्रशिक्षक अझहर झैदी यांचाही या यादीत समावेश आहे.

याचे व्यवस्थापक शादाब अहमद आहेत. यूएईचे देशांतर्गत खेळाडू रिझवान जावेद आणि सलिया सामन आहेत. 6 जणांना निलंबित करण्यासोबतच, ICCने प्रत्येकाला आरोपांवर उत्तर देण्यासाठी 19 दिवसांची मुदत दिली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---