सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा वाद होत असतात. आता सध्या भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात वाद होताना दिसत आहे. ते दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करत आहे.
मुक्ताईनगरच्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नजमा तडवी यांची वर्णी लागली आहे. जो निर्णय २०२१ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता, त्या निर्णयाला महायुतीच्या सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नजमा तडवी यांनी पुन्हा नगराध्यपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
नजमा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावरुन या वादाला सुरुवात झाली होती. त्यांनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र जमा केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला होता.
काही लोकांनी नजमा यांचे जातवैधता प्रमाणपत्र वेळेत मिळू नये यासाठी प्रयत्न केला होता, असे मंगेश चव्हाण यांनी म्हटले होते. तसेच खडसे या विषयाचे ऑडिट होणार, ते जनतेसमोर येणार, याशिवाय याला पुर्णविराम नाही, असे म्हणत त्यांनी खडसेंवर टीका केली होती.
आता मंगेश चव्हाणांच्या टीकेवर एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले आहे. काय ऑडिट करायचं ते कर, तुला कोणी अडवलंय. मी बाप दाद्यापासून श्रीमंत आहे. तुझ्यासारखा मी हमाल किंवा भंगार विकणारा नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
तसेच काय ऑडिट करायचं असेल ते कर. मी आतापर्यंत सर्व पाहून बसलोय ईडी वगैरे. तुझी आधी किंमत आणि कुवत तपासून घे. मग माझ्यावर बोल. नजमा तडवी यांची अपात्रता नियमानुसारच झाली आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मंगेश चव्हाण यांना चांगलेच सुनावले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंचे नाव कागदावर नसले तरी सर्टिफिकेट न मिळू देण्यामागे त्यांचाच हात आहे. अशी हुकूमशाही मी चालु देणार नाही. आता ऑडिट सुरु झालंय. खडसेंचही ऑडिट होणार आहे, असा इशारा मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना दिला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती.