केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका कुटूंबाने आयुष्य संपवले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील कदमाक्कुडी परिसरातील राहत्या घरी त्यांचे मृतदेह सापडले. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या जोडप्याने आधी मुलांना संपवून मग गळफास घेतला. आर्थिक अडचणींना कंटाळून त्यांनी आयुष्य संपवले आहे. असे असताना घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. याच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, ऑनलाईन लोन ऍपमुळे कुटुंबाचा शेवट झाला आहे. पत्नीने ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. त्यांना हे कर्ज फेडता आले नाही. त्यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या. यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
यामध्ये निजो (४०), त्याची पत्नी शिल्पा (३०) मुलं अबेल (७) आणि ऍरॉन (५) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, ऍपसाठी काम करणाऱ्यांनी महिलेचे मॉर्फ केलेले फोटो तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवले होते. यामुळे महिला घाबरली होती.
महिलेच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज सापडले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याबाबत निजो मोबाईल कॉलला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे निजोची आई त्याच्या घरी गेली. तिने दार ठोठावले. पण तरीही काहीच उत्तर आले नाही.
त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आत निजो आणि त्याची पत्नीखाली पडली होती. तसेच मुलांचे मृतदेह दुसऱ्या खोलीत पडलेले होते. हे दृश्य बघून त्यांना धक्काच बसला. यानंतर याठिकाणी पोलीस आले. यामुळे घटना उघडकीस आली.