राखी पौर्णिमेला बहीण आपल्या भावाला राखी बांधते. हा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. असंच एक रक्षाबंधन कोल्हापुरातील बहीण भाऊ च होत असते. मात्र, अचानक भावाचं निधन झाले. यामुळे बहिणीला मोठा धक्का बसला.
असे असताना भावाने शेवटच्या क्षणी बहिणीकडून भावाचा जीव ज्या व्यवसायात अडकला होता, तो व्यवसाय त्याच्या पश्चात पुढे चालवीन असे वचन बहिणीने दिले. नंतर भावाने जीव सोडला. आता हा व्यवसाय बहीण भावाच्या इच्छेनुसार पुढे घेऊन जात आहे. कोल्हापूरमध्ये गेल्या ४० वर्षांपासून पारंपारिक चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणाऱ्या महादेव गणपती गाडेकर यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले.
महादेव गाडेकर यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून चप्पल, बुट विक्री आणि रिपेअर करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, ४ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. बहीण शालिनी बाबू सातपुते हिला बोलावून घेऊन महादेव यांनी आपला व्यवसाय सांभाळण्याचे वचन घेतले होते.
आता वयाच्या ७७ व्या वर्षीही बहीण शालिनी सातपुते यांनी आपला शब्द पाळला आहे. गेल्या चार वर्षांपासून भावाचा हा व्यवसाय त्या स्वतः सांभाळत आहेत. दिवसभर रस्त्याकडेला बसून स्वतःचे चहापाणी होईल इतकी कमाई होते. यामुळे त्यांची चर्चा नेहेमी होत असते.
सकाळी लवकरच ७७ वर्षीय शालिनी सातपुते या सुभाष नगरातील घरातून बाहेर पडतात. त्या भावाच्या या छोट्याश्या दुकानापर्यंत चालत येतात. दुकान उघडले की दुकानात असलेल्या भावाच्या फोटोला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करतात.
येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना चप्पल बूट पॉलिश करायला येणाऱ्या ग्राहकांना भावाचे दुकान मी सांभाळत असल्याचे त्या सांगतात. तसेच अनेकदा हे सांगत असताना त्या भावूक देखील होतात. भावाचा फोटो देखील याठिकाणी त्यांनी लावला आहे.