सगळं सुखात सुरू होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच होत, खेळता-खेळता बाप-लेकीचा थरारक मृत्यू, पत्नी बेशुध्द

पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील इंद्रायणी नदी लगत असणाऱ्या इंद्रायणी वाटिका या इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डक्टमध्ये पडून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेने परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे. ते दोघे डक्ट जवळ खेळताना अचानक तोल गेला आणि आठव्या मजल्यावरून घसरले त्यात ते गंभीर जखमी झाले. लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

रमेश मारुती लगड आणि अडीच वर्षांची मुलगी श्रेया अशी मृतांची नावे आहेत. रमेश हे त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत या ठिकाणी रहात होते. रमेश लगड हे लष्कराच्या सेंट्रल ऑर्डनन्स डेपोत नोकरीला होते.

दरम्यान, रमेश हे आपल्या मुलीसोबत इमारतीखाली खेळत होते. नंतर ते त्यांच्या घरी आठव्या मजल्यावर गेले. डक्टजवळ खेळत असताना आठव्या मजल्यावरून घसरून ते डक्टमध्ये पडले. यामुळे एकच पळापळ झाली.

यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. पत्नीला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोणाच्या मनी ध्यानी नसताना अशी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शेजारच्यांनी घटनेची माहिती दिली आहे. पोलीस याबाबत माहिती घेत आहेत.