ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी हे आपल्या कामामुळे चर्चेत होते. त्यांनी एक काळ विशेष गाजवला. अनेक बड्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. मात्र त्यांचे अचानक निधन झाले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला होता. यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
बऱ्याच हिट चित्रपटांमधून रवींद्र यांनी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली. रवींद्र यांच्या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. अनेकांनी रवींद्र यांच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ व्यक्त केली. रवींद्र हे सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते.
या देखण्या कलाकाराबाबतचा एक किस्सा रवींद्र यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी सांगितला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात त्यांच्या आयुष्याबाबतचे किस्से सांगितले आहेत.
यात त्यांनी रवींद्र यांच्यावर एका अभिनेत्रीचं प्रेम होतं, असे म्हटले होते. त्या म्हणाल्या, मी वानखेडे स्टेडियमला नोकरी करीत होते त्यामुळे मी घरी नसायचे. तेव्हा रवीबरोबर एका चित्रपटात काम केलेली अभिनेत्री त्याच्यावर फिदा होती.
ती माझ्या घरी फोन करायची. घरातला नोकर फोन घेत असे. त्याच्याकडून रवी कोणत्या शहरात शूटिंग करत आहे, याची ती माहिती घ्यायची. नंतर ती त्याच्या हॉटेलमधे जायची. त्यांना भेटायचा प्रयत्न करायची. रवीला कळले की, तो मलाच फोन करायचा, की हिला कोणी माहिती दिली, की मी इथं आहे म्हणून.?
ती माझ्या रूममधे जाऊन बसली असणार. कधी तो तिला टाळण्यात यशस्वी व्हायचा. कधी रुममधे गेल्यावर कळायचे. ती मग तिथे त्याच्याबरोबरच राहायची, असेही त्यांनी सांगितले आहे. या पुस्तकात त्यांनी हा खुलासा केला आहे. एकदा तर ही नटी अचानक घरी आली. तिने आमच्या घरातला बार उघडला आणि हॉलमधे पीत बसली.
ती इतकी प्याली की, तिथेच पडली. मी ऑफिस सुटल्यावर घरी आले, तर सासूबाईंनी मला ती कशी पसरली आहे ते दाखवले. थोड्या वेळानं रवीही आला. ती रवीला म्हणाली, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मला म्हणाली, आपण दोघीही याच्याबरोबर एकत्र राहू. मात्र तसे काही झाले नाही.