वडील लहाणपणीच वारले, आईने दारू विकून शिकवलं, मुलगा बनला भिल्ल समाजातील पहिला कलेक्टर…

वडील पोटात असताना वारले, आईने दारू विकून शिकवले अन् मुलाने करूनच दाखवले, अस काहीसं डॉ. राजेंद्र भारूड यांच्याबाबत घडले आहे. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. वडील कसे होते हे त्यांना कधीच कळलं नाही.

घरी काहीच नव्हते. फक्त त्यांची आईचं दिवसभर राबायची आणि सगळी जबाबदारी पडायची. त्यांचा मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय होता.पोराने शिकावे काहीतरी करावे असे त्यांना नेहेमी वाटत असे. घरची परिस्थिती बेताची होती पण स्वप्न मात्र कमालीची मोठी होती.

त्यांना बारावीला ९७ टक्के गुण मिळाले. स्वतःच्या गुणांच्या जोरावर त्यांनी मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या.

सुरुवातीला त्यांना कलेक्टर होण्यासाठी काय करायचे असतं हेच तिला माहीत नव्हते. मात्र आयएएस ऑफिसरची तयारी जोमाने केली. वर्षांच्या शेवटी एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि दुसरीकडे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा निकाल हातात होता.

दरम्यान, पास झाल्यानंतर आपला राजू कंडक्टर झाला, म्हणत माझे कौतुक केले. आपण कोणत्या समाजातून येतो यापेक्षा आपण कसं शिकतो हे महत्त्वाचे आहे. वर्षांच्या शेवटी एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि दुसरीकडे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा निकाल हातात होता.

याबाबत डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले, मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला. पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे.

मायला फक्त माहिती होत की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनल आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटले. असे असले तरी त्यांनाही कलेक्टरचा अर्थ कळाला नाही.