प्रेमासाठी कायपण म्हणत तरुण-तरुणी हे अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी करत असतात. अशीच एक महिला सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ती आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानमधून भारतात आली आहे. सीमा हैदर असे तिचे नाव आहे.
सीमाचे सचिनवर खुप प्रेम असल्यामुळे तिने पाकिस्तानातील सर्व नाती सोडून भारत गाठले आहे. अशात सीमा बाबत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. लोकांनाही तिच्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेण्यास आवडत आहे.
भारतात पोहचलेल्या सीमासोबत तिची चार मुलंही आली आहे. आपण सचिनसाठी सर्वकाही सोडून आल्याचा दावा सीमाने केला आहे. पण तिच्या पाकिस्तानातील सासऱ्याने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. त्यांनी सीमावर चोरी केल्याचा आरोप लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमाचे सासरे मीर जान यांनी आरोप केले आहे. ते म्हणाले की, सीमा सात तोळे सोने आणि सात लाख कॅश रुपये घेऊन पळून गेली आहे. तसेच पोलिसांनी तिला पकडले असता तिच्याकडे तीन आधारकार्ड आढळून आले आहे. त्यामध्ये एक तिच्या पतीचे, दुसरे वडिलांचे आणि तिसरे तिचे आधार कार्ड होते. तसेच तिच्याकडे पाच स्मार्टफोनही सापडले आहे.
भारतात आल्यावर सीमा म्हणाली की, मी दागिने गहाण ठेवून पतीला परदेशात पाठवले होते. त्यानंतर पतीने पाठवलेल्या पैशातून मी घर खरेदी केले होते. पण सचिनच्या प्रेमात पडल्यानंतर मी घर विकले आणि त्याच पैशांमधून मी पाकिस्तानातून भारतात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमाचा पती हा दुबईत कामाला आहे. तिला त्याच्यापासून चार मुलंही झालेली आहेत. पण ऑनलाईन गेम खेळत असताना ती सचिनच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. ती बेकादेशीरपणे नेपाळमार्गे भारतात आली आहे.