जळगावच्या कोमल शिंदे या तरुणीने अतिशय खडतर प्रवास करून पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. यामुळे तिचे कौतुक केले जात आहे. तिला कॉलेजची फी भरताना नाकीनऊ यायचे, स्टडी टूरला जायचे तर आधी भावला पाठवायचे की स्वत: जायचे अशी तजजोड करावी लागायचे, मात्र आता त्यांची सगळी परिस्थिती बदलणार आहे.
ती आता पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. राजारामनगरमध्ये छोट्या घरात राहणारी कोमल शिंदे (२६) पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. यामुळे तिच्या आणि कुटूंबाच्या आनंदाला सीमा उरली नव्हती.
तिचा हा यशाचा मार्ग सोपा नव्हता. आर्थिक स्थितीमुळे तिला कॉलेजची फी भरताना अनेक अडचणी यायच्या कॉलेजची स्टडी टूर असो की इतर गोष्टी अनेकदा विचार करायला लागायचा. मात्र त्यांना शिकवताना घरच्यांनी दिवस रात्र एक केला.
आई भारती व वडील सोपान शिंदे यांनी यासाठी खूप कष्ट केले आहेत. आई सकाळी खासगी कंपनीत काम करून घरी आल्यावर कपड्यांना इस्त्री करून द्यायची. यामुळे दिवसरात्र ती कामात असायची, कारण मुलांना चांगले शिक्षण मिळावे.
वडील जळगावच्या ग्रामीण भागात गावांमध्ये फिरून कपडे विकतात. सुरुवातीला त्यांच्याकडे सायकल होती, नंतर त्यांनी टू व्हीलर घेतली. खर्च कमी व्हावा म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जळगावातच केला. ती म्हणाली. परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती. पण निकाल लागत नव्हता, त्यामुळे रडत होते.
अगोदर लिपिक व कर सहायक पदाची परीक्षा १-२ गुणांनी पास होऊ शकले नव्हते. त्यामुळे याही परीक्षेत काय होते याचे टेन्शन आले होते. यामुळे मनावर एक प्रकारचे दडपण देखील होते. मोबाईल बंद करून ठेवल्यावर इतर सहकाऱ्यांनी तू परीक्षा पास झाल्याचे सांगितले.
यामुळे खूप आनंद झाला. आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. नियुक्ती मिळाल्यावर आई-वडिलांनी सोबत घेऊन जाणार आहे. आई-वडिलच प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्याशिवाय हे कधीच शक्य झाले नसते.