अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा!! मनसे नेते वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी…

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे. वसंत मोरे यांनी मध्यरात्री 12 वाजता एक पोस्ट लिहिल्यानंतर ते पक्ष सोडणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.

एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आता त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा, अशी पोस्ट त्यांनी कडून आपला राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांनी मंगळवारी मध्यरात्री फेसबुकवर एक पोस्ट लिहिली.

त्यामध्ये ते म्हणतात की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. दरम्यान, ते लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक होते.  लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले वसंत मोरेंनी त्यांची तयारी सुरू केली आहे.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत  नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. कुठेही अन्याय होवो, त्या ठिकाणी जातीने हजर राहून न्याय मिळवून देणे, कोणतीही समस्या आपल्या स्टाईलने सोडवणे आणि धडाडीने काम करणे ही वसंत मोरे यांची ओळख होती. 

दरम्यान, वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे पुणे शहरात मनसे पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये वसंत मोरे यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या पुणे शहराच्या पक्षातील अंतर्गत फूट असल्याचे दिसून आले.

यानंतर ते पक्ष सोडणार असल्याचीही चर्चा झाली, अखेर त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करून त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात आपण कोणत्या पक्षात जाणार काय भूमिका घेणार हे देखील सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.