गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. असे असताना आता मावळच्या सदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे 9 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने मावळमध्ये खळबळ उडाली आहे
याबाबत पोलीस तपास करत आहेत. असे असताना आरोपीने परंडवाडी येथे गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची बातमी समोर आली आहे. विजय शशिकांत मालपोटे असे या आरोपीचे नाव आहे. सदापूर येथे आरोपी विजय मालपोटे याने नऊ वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या आमिष दाखवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
असे असताना नंतर आपल्याकडून फार मोठी चूक झाली, म्हणून त्याने आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती समोर आल्यानंतर सगळेच हादरले. या आरोपीचा शोध देखील घेतला जात होता.
असे असताना मात्र आरोपीने आत्महत्या केल्याचीच बातमी नंतर समोर आली आहे. याबाबत तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहे. दरम्यान, आधी 9 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार, नंतर स्वतःचं जीवन संपवलयाचे नेमकं कारण काय? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यामुळे पोलीस देखील याबाबत सखोल तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे घटना घडत आहेत. यामुळे पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे.