सध्या मित्राचा बर्थडे आणि त्याच्या बर्थडेचे सेलिब्रेशन हे खास बनवण्यावर मित्रांचा भर असतो. त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला मित्र तयार असतात. पण अशाच दोन मित्रांना त्यांच्या कृतीमुळे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
मित्रासाठी त्यांनी असे काही केले आहे की त्यांना थेट तुरुंगाचीच हवा खावी लागली आहे. इंदोरमध्ये एका मित्राचा वाढदिवस होता. त्याच्या पार्टीसाठी तरुणांनी थेट एका व्यक्तीचा मोबाईल चोरला होता. त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणांना चांगलाच धडा शिकवला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. तर तिसरा अजूनही फरार आहे. पोलिस त्या तरुणाचा शोध घेत आहे. संबंधित घटना ही इंदोरच्या ठाणे क्षेत्रात घडली आहे. मित्रासाठी चुकीच्या मार्गावर जाणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
ठाणे क्षेत्रात राहणारे राम जाट हे घराबाहेर पडले होते. त्यावेळी ते मोबाईलवर बोलत असताना अचानक तिथे बाईकवर तीन तरुण आले आणि ते मोबाईल घेऊन पळून गेले. त्यानंतर राम जाट यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. मोबाईल चोरताना ते बाईक तिथेच सोडून गेले होते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली आणि ती बाईक कोणाच्या नावावर आहे हे तपासले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते दिसल्यामुळे त्यांना ते कोण होते हे कळाले.
आता पोलिसांनी तिघांपैकी दोघांना अटक केली आहे तर तिसरा अजूनही फरार आहे. तो जो तिसरा आरोपी होता त्याचे नाव राजू असून त्याचाच वाढदिवस होता. त्याच्या बर्थडे पार्टीसाठीच त्यांनी ही चोरी केल्याचे समोर आले आहे.
या तिन्ही आरोपींचे गुन्हेगारीचे रेकॉर्डही पोलिसांना मिळाले आहे. सध्या राजू हा फरार आहे. त्यामुळे तो नक्की कुठे गेला असेल याची पोलिस चौकशी करत आहे. तसेच त्यांच्याकडून अजून कोणते चोरीचे सामान सापडते का? याचाही पोलिस तपास करत आहे.