सकाळी गणपत्ती बाप्पाचं आगमन, अन् घरात तिघांचे मृतदेह, मृतांमध्ये गरोदर महिला, भयंकर माहिती आली समोर…

सध्या जगभरात गणेशोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. असे असताना कर्जत तालुक्यातील चिकणपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशिर पाडा येथे तिघांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पती,पत्नी आणि एक लहान मुलाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे.

यामध्ये विवाहित महिला ही सात महिन्यांची गरोदर होती. घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असताना मध्यरात्री तिघांचे खून झाल्याने कर्जत तालुका हादरला आहे. याबाबत पोलिस तपास करत असून या घटनेमुळे आसपास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, हनुमंत हा गवंडी काम करायचा तर मदन पाटील याची पत्नी अनिशा या तेथे आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करीत होत्या. जैतू पाटील यांनी बांधलेले घर हे मदन जैतू पाटील यांचे नावे होते. वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून देण्यात यावा यासाठी हनुमंत हा आपला भाऊ मदन सोबत सातत्याने भांडत होता.

दरम्यान, घटनेदिवशी हनुमंत जैतू पाटील याने आपल्या पत्नीला माहेरी भडवळ येथे पाठवून दिले होते. सात सप्टेंबरच्या रात्री त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाला. सकाळी दहा वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यात विवेक मदन पाटील या दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली.

यावेळी स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. स्थानिकांनी त्यानंतर त्या मुलाच्या आईबाबांची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्याच नाल्यात अनिशा मदन पाटील यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस मृतदेह ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. यामध्ये काहीजण ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी त्या घरातील चौथा सदस्य असलेल्या हनुमंत जैतू पाटील यास संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत असून अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.