प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. गेल्या शुक्रवारी त्यांच्या निधनाबाबत समोर आले होते. ते घरात एकटेच राहत होते. पुण्यातील एका फ्लॅटमध्ये ते राहत होते. फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
१३ जुलैला त्यांचे निधन झाले होते. पण १४ जुलैला घराच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना घरातून दुर्गंधी येऊ लागली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावले होते. त्यानंतर हे सगळं काही समोर आलं होतं. रवींद्र महाजनी यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
अशात रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनीवर लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. गश्मीरने मुलगा म्हणून रवींद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले नाही, त्यांची काळजी घेतली नाही, तो मुलगा म्हणून खुप चुकीचा वागला आहे. अशी टीका त्याच्यावर केली जात आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून रवींद्र महाजनी एकटे राहत होते. त्यावरुन लोकांनी गश्मीरला सुनावले आहे. वडिलांचे कर्ज फेडले पण ते वृद्ध झाले असताना त्यांची काळजी का घेता आली नाही? असा प्रश्न लोक विचारताना दिसून येत आहे. अनेकजण त्याच्या इंस्टाग्रामच्या पोस्टवर जाऊन त्याच्यावर टीका करत आहे.
त्यामुळे सतत होणाऱ्या टीकांना आता गश्मीर महाजनीने उत्तर दिले आहे. ते एक स्टार होते, त्यांना स्टारच राहूद्या. मी आणि माझ्यासोबत असणारे लोक शांत राहत आहे. तुम्हाला जर माझा द्वेष करायचा तर तुम्ही तो करु शकतात.
तसेच तो पुढे म्हणाला की, माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळो. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती सुद्धा होते. आम्ही त्यांना तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो. कदाचित भविष्यात मी सगळ्या गोष्टींचा नक्कीच उलगडा करेल.