---Advertisement---

प्रियकराच्या मित्रांनी केला तरुणीवर वारंवार बलात्कार, नागपूरमध्ये फ्रेंन्ड्स विथ बेनिफिटचा धक्कादायक प्रकार

---Advertisement---

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील खापा पोलीस ठाण्यांतर्गत गावातील एका १५ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या प्रियकरासह सात जणांनी तिच्यावर बलात्कार केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस तपास करत आहेत. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल देखील करण्यात आले. आरोपींनी फोटो दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. यामुळे ही तरुणी खुपच घाबरली होती.

पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. याबाबत माहिती अशी की, धीरज हिवरकर याने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून तिची फसवणूक केली. तो तिला एका निर्जन घरात घेऊन गेला आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

नंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर देखील टाकले. नंतर त्याने तिला ब्लॅकमेल करुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्याने त्याचे इतर मित्र निखिल धांडे, गौरव खुबाळकर, सुशील धर्मन यांना शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. तिने नकार दिल्याने त्याने तिचा फोटो गावात दाखवण्याची धमकी दिली.

नंतर काही दिवसांतच आरोपीने आपल्याच मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. वरील सर्व आरोपींनी मुलीचे अश्लील फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केले. नंतर पीडित मुलीची मानसिक स्थिती आणि प्रकृती खालावली. आईने तिची गंभीरपणे विचारपूस केली. वारंवार झालेल्या सामूहिक बलात्काराची माहिती तिने आईला दिली.

आईच्या पायाखालची जमीन सरकली. यामुळे प्रकरण उघडकीस आले. याबाबत धीरज हिवरकर, वेदांत आवटे गोलू लिखार, विकास हेडाऊ, लकी धार्मिक, सर्व रा. खापा, अशी आरोपींची नावे आहेत. वरील आरोपींविरुद्ध खापा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---