Gold rate : सध्या दिवाळी सुरू झाली असून सर्वजण दिवाळीची तयारी करत आहेत. सर्वांची खरेदीची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आता दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण पाहायला मिळत असून मौल्यवान धातूच्या किमती स्वस्त झाल्या आहेत. यामुळे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर घाई करावी लागणार आहे. सध्या दरात चांगलीच घट झाली आहे.
मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,७०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २५ कॅरेट सोन्याचा दर ६०,७६० रुपये प्रति १० ग्रॅम असून चांदीचा दर ७३,२०० रुपये प्रति किलो आहे. सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा कमी झाला तर चांदीच्या दरातही दिलासा मिळाला आहे.
आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४०० रुपयांनी घसरला तर चांदीच्या दरातही प्रतिकिलो ३०० रुपयांची घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दिवाळीत तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे. सध्या जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे भाव पुन्हा तेजीत परतताना दिसत असले तरी देशांतर्गत बाजारात भावांना साथ मिळत नाही.
जागतिक बाजारात सोने ८.९२ डॉलरच्या वाढीसह १९५९.७५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर चांदी $०.१७ वाढून $२२.७२ प्रति औंसवर ट्रेंड करत आहेत. ११ मे २०२३ रोजी सोन्याने ६१,५८५ रुपये प्रति १० ग्रॅमची सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठली होती.
दरम्यान, दिवाळीत धनत्रयोदशी म्हणजे धन तेरसच्या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणे चांगली मानली जाते. तर या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असून यादिवशी ग्राहक सोन्या-चांदीच्या खरेदीला प्राधान्य देतात.