MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जगभरात करोडो चाहते आहेत. असे काही चाहते आहेत जे त्याच्यासाठी काहीही करतील. असाच एक चाहता होता तामिळनाडूचा रहिवासी गोपी कृष्णन. पण गोपी कृष्णन आता या जगात नाही.
महेंद्रसिंग धोनीच्या एक चाहत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तमिळनाडूतील रामनाथम येथील गोपी कृष्णन (३४) याने गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कृष्णन हा धोनीचा अतिशय मोठा चाहता होता.
कृष्णनने चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीचा रंग असलेल्या पिवळ्या रंगात आपले घर रंगवले होते. त्या घराचं नाव ‘होम ऑफ धोनी फॅन’ असे ठेवले होते. २०२०मध्ये त्याच्या घराचे फोटो खूप व्हायरल झाले होते. कृष्णनच्या घरचा व्हिडिओही धोनीपर्यंत पोहोचला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धोनीनेही त्याचे कौतुक केले होते.
कृष्णनचा भाऊ राम यांनी थांथी टीव्हीला सांगितले की, त्याच्या भावाचा शेजारच्या गावातील काही लोकांशी पैशावरून वाद सुरू होता. नुकतेच कृष्णन याची त्या लोकांशी भांडण झाले होते. त्यात तो जखमी झाला होता. यानंतर तो खूप दुःखी होता, असं राम यांनी सांगितले.
पोलिसांनी कृष्णनच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना कृष्णनच्या घरातून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्याने पैशाच्या वादातून आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. या घटनेमुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. धोनीनेही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे क्रिकेट जगतातही एकच खळबळ उडाली आहे. कृष्णनच्या आत्महत्येमुळे क्रिकेट जगतावरही शोककळा पसरली आहे. अनेक क्रिकेटपटूंनी आणि संघांनी कृष्णनच्या आत्महत्येवर शोक व्यक्त केला आहे.