रात्री सोबत जेवण केलं, आई झोपली अन् ३ सख्ख्या बहिणींना झाडाला घेतला गळफास; भावाने सगळंच सांगीतलं..

तीन बहिणींनी एकाच दोरीने गळफास घेतल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस याबाबत तपास करत आहेत. ही घटना खंडवा जिल्ह्यातील जावर ठाण्याच्या क्षेत्रातील कोठाघाट गावात घडली आहे.

या मुलींच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. रात्री तिन्ही बहिणींनी आई आणि भावासह एकत्र जेवण केले. त्यानंतर सगळेजण झोपी गेले, तेव्हा या बहिणींनी हे टोकाचे पाऊल टाकले आहे. या धक्कादायक घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे.

त्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी खंडवा जिल्ह्यातील मुख्यालयात पाठवले आहेत. आता या आत्महत्येच्या कारणामाचा शोध पोलीस घेत आहेत. आईने जेव्हा मध्यरात्री उठून बघितले तर त्यांना या मुली दिसल्या नाहीत. नंतर त्यांचे मृतदेह एकाच दोरीने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. यामुळे खळबळ उडाली.

आम्ही एकूण आठ भावंड आहोत. तिन्ही बहिणी सनू, सावित्री आणि ललिता ह्या मंगळवारी बाजारात गेल्या होत्या. जेवण झाल्यावर बहिणी रात्री घरातून बाहेर पडल्या. तसेच त्यांनी बाहेरून दरवाजाची कडी लावली, अशी माहिती त्यांच्या भावाने दिली.

दरम्यान, त्यांना काय त्रास होता, याबाबत त्यांनी कधी काही सांगितले नाही, तसेच आमचे कुणाशीही वैर, भांडण नव्हते, असे या तरुणींच्या भावाने सांगितले, यामुळे याचा तपास पोलीस करत आहेत.

सनू कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तर सावित्रीचे लग्न झाले होते आणि ललिता लहान होती. ही धक्कादायक घटना खंडवा जिल्ह्यातील जावर ठाण्याच्या क्षेत्रातील कोठाघाट गावात घडली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.