Hamas attacks Israel : गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. आता युद्धाला १४ दिवस उलटून गेले आहेत. अजूनही यांच्यातील युद्ध सुरूच आहे. यामध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर या युद्धाला सुरूवात झाली.
असे असताना हमासच्या दहशतवाद्यांनी ‘कॅप्टगॉन’ नावाच्या गोळ्या घेतल्या होत्या, असे म्हटले जात आहे. यामुळे या गोळ्या नेमक्या आहेत तरी कशा? यामुळे काय होते? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे अनेकांनी याबाबत विचारणा केली होती.
इस्रायलच्या भूमीवर मृतावस्थेत आढळलेल्या हमासच्या दहशतवाद्यांकडे गोळ्या आढळल्याचे दिसून आले होते. याबाबत माहिती अशी की, कॅप्टगॉन हे ‘अॅम्फेटामाईन’प्रमाणेच एक उत्तेजक म्हणून काम करते, जर्मनीमध्ये १९६० साली निर्माण करण्यात आलेल्या एका औषधाप्रमाणेच हे औषध वाटते.
दरम्यान, अनेक देशांनी या औषधावर बंदी देखील घातली आहे. याच औषधाला पर्याय म्हणून बल्गेरियात कॅप्टगॉन नावाच्या बनावट गोळ्या तयार करण्यात येत होत्या. टर्कीमधील गुन्हेगारी टोळ्यांच्या मदतीने केली जायची.
अॅम्फेटामाईन हा ड्रग्ज मानवाच्या मज्जासंस्थेला उत्तेजना देतो. अॅम्फेटामाईन ड्रग्जमुळे शरीरात उर्जा संचारल्यासारखे वाटते. या ड्रग्जमुळे झोप येत नाही. ड्रग्ज घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती जास्त काळासाठी जागे राहू शकतो.