प्रसिद्ध लेखक हरी नरके यांचे निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयामध्ये हरी नरके यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
हरी नरके यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ते प्रसिद्ध विचारवंत आणि प्राध्यापकही होते. ५० पुस्तकांचे त्यांनी लेखन आणि संपादन केले होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी त्यांनीच चळवळ सुरु केली होती.
मराठी भाषा ही अडीच हजार वर्षांपूर्वीची आहे, असे म्हणत त्यांनी पुरावेही दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांनी ते प्रभावित होते. आता त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
हरी नरके यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी आणि त्यांची मुलगी असा त्यांचा परिवार आहे. तळेगाव ढमढेरे याठिकाणी ते राहत होते. त्यांचे लहानपण खुप गरीबीत गेले होते. पण मेहनत करुन अभ्यास करुन त्यांनी कुटुंबाला चांगले दिवस आणले होते.
हरी नरके यांच्या पत्नीचे नाव संगीता आहे. तसेच त्यांची मुलगी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रमिती नरके असे तिचे नाव आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तिने हेमाची भूमिका साकारली होती. ती भूमिका खुप गाजली होती.
प्रमितीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अनेक नाटकांमध्ये तिने काम केले होते. त्यानंतर तिला मालिकेत संधी मिळाली होती. पण सतत मेकअप होत असल्यामुळे प्रमितीने मालिका सोडली होती. त्यामुळे तिचे चाहतेही नाराज झाले होते.
दरम्यान, हरी नरके यांनी समता परिषदेचे उपाध्यक्ष, तसेच शासकीय समित्यांवर तज्ञ म्हणून काम केले होते. दुर्बल, वंचित लोकांची बाजू ते मांडायचे. देशविदेशामध्ये केलेली त्यांची अनेक व्याख्याने गाजली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यावर त्यांनी पुस्तके सुद्धा लिहीली होती.