Haunted Rolls Royce : लोणावळ्यामध्ये एका पछाडलेल्या रोल्स रॉयसची कथा कुप्रसिद्ध आहे. यामुळे याची चर्चा नेहेमी होत असते. यामध्ये लोणावळ्याच्या आजाबाजू्च्या परिसरामध्ये आयशा व्हिला आणि याच बंगल्यात पार्क केलेल्या पछाडलेल्या रोल्स रॉयसची कथा तुम्ही ऐकली असेल. याठिकाणी काही सध्या काही तरुणांनी भेट दिली.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे तरुण बाईक रायडर्स असून या दंतकथा ऐकून त्यांनी आयशा व्हिलाला भेट दिली आणि येथील ही पछाडलेली रोल्स रॉयस पाहिली. यामुळे याची चर्चा सुरू आहे. तरुणांनी या कारबाबत माहिती दिली आहे.
या बंगल्यात राहणाऱ्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. तसेच या बंगल्यातील 17 वर्षीय आयशा नावाच्या तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची याच बंगल्यात हत्या करण्यात आल्याचा दावा केला जातो. याबाबत धक्कादायक माहिती अनेकजण सांगतात.
नंतर या बंगल्यामधून विचित्र आवाज येणं, आकृत्या दिसणं असे भास होऊ लागले. ही रोल्स रॉयस या जोडप्याचीच असून तेव्हापासून ती अशीच पडून आहे. ही कार रोल्स रॉयसची सिलव्हर शॅडो मॉडेल आहे. 1965 ते 1980 दरम्यान या कारची निर्मिती झाली. मात्र आता ती धूळखात पडून आहे.
दरम्यान, युट्यूबवरील अन्य एका व्हिडीओमध्ये या कारच्या मालकाला आता ही कार दुरुस्त करायची आहे, असेही म्हटले आहे. ही कार 2004 साली लकीर नावाच्या चित्रपटातही दिसली होती.
दरम्यान, अनेकांना याबाबत रंजक माहिती नाही. आयशा बंगला सध्या जुन्या मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्यात आहे. या ठिकाणी माणसांचा वापर नसल्याने हा बंगला आणि त्यामध्ये उभी असलेलवी रोल्स रॉयस एखाद्या भयान घटनेप्रमाणे दिसते. अनेक लोक या कारवर दगड फेकून मारतात.
यामुळे कारचे नुकसान झाले असून कारची विंडशिल्ड, हेललॅम्स फुटले आहेत. या कारचा पुढील बराच भाग गंजला आहे. या कारची नेहेमी चर्चा होते. तसेच प्रवास करणारे याकडे नक्की बघतात.