प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचं नाव मराठी चित्रपट क्षेत्रात आदराने घेतलं जातं. अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. सिंहासन’ या मराठी चित्रपटातून उषा ताई यांनी झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवले आणि नंतर मागे त्यांनी वळून पाहिले नाही. त्यांनी चित्रपटांनंतर मालिकेत एण्ट्री घेतली.
यामध्ये देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना बॉलिवूडमध्येही अनेक नावाजलेले कलाकार आणि दिग्दर्शक ओळखतात. नुकतंच त्यांनी साऊथचा सुपरस्टार विजय सेतूपतीबरोबरही काम केले. ही एक मोठी गोष्ट आहे. ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटात उषा नाडकर्णी व विजय सेतुपती यांनी एकत्र काम केले.
यामध्ये उषा यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. यावेळी विजयच्या साध्या स्वभावामुळे उषा नाडकर्णी त्याच्यावर खूपच खुश झाल्या. साऊथचा सुपरस्टार असलेल्या विजयचा साधेपणा उषा ताई यांना अतिशय भावला. यावेळी विजयचे कौतुक करण्यात त्या मागे राहिल्या नाहीत. यामुळे याची जोरदार चर्चा झाली.
याबाबत उषा नाडकर्णी म्हणाल्या की, गांधी टॉक्स या चित्रपटात मी विजयच्या आईची भूमिका केली आहे. तो अगदीचं साधा आहे. आपल्याकडे मराठीत किंवा हिंदीत इतकूसं काम केलं तरी माज दाखवतात. पण तो इतका मोठा माणूस असूनही जमिनीवर बसतो, असे म्हणत त्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, आम्ही दोघे माय-लेक असून चित्रपटाच्या दरम्यान खूप गप्पा मारल्या. तो इतका साधा आहे की, लोकांनी त्याच्याकडून शिकलं पाहिजे. पॅकअपच्या दिवशीही त्याने मला नमस्कार केला तेव्हा मी पण त्याचे गाल ओढले. एवढा मोठा नट असूनही त्याला अजिबात माज नाही, असे म्हणत त्याचे कौतुक केले.
दरम्यान, या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटात विजय सेतुपतीबरोबर अभिनेता सिद्धार्थ जाधव, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी यांच्यासह उषा नाडकर्णी यांचीही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामुळे याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.