---Advertisement---

मॉलमध्ये दागिने चोरण्यासाठी तो रात्रभर पुतळा बनून उभा राहिला, संध्याकाळ झाली अन्…

---Advertisement---

पोलंडची राजधानी वॉर्सा येथे एक चोरीची घटना समोर आली आहे. मात्र या चोराची कथा ऐकून तुम्ही त्यांच्या चोरीच्या पद्धतीचे चाहतेच व्हाल. एखाद्या चित्रपटात अशी घटना घडते, अगदी तशीच घटना याठिकाणी घडली आहे. तरुणाने दागिने चोरण्यासाठी शक्कल लढवली.

तो एक पिशवी हातात घेऊन ड्रेस परिधान केलल्या पुतळ्या सारखा उभा राहिला. शॉपिंग मॉलमधील कपड्याच्या दुकानात ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे अगदी हुबेहूब नक्कल त्याने केली. यामुळे तो चोर आहे, असे कोणाच्याही लक्षात आले नाही.

संध्याकाळी मॉल बंद होताना शटर अर्ध खाली खेचले होते. तेव्हा हा तरुण आत शिरला आणि त्याने हा प्रकार केला. तरुण दुकानाच्या काचेच्या खिडकीच्या मागे पुतळा होऊन उभा राहिला. तसेच त्याने बॅग हातात धरलेली दिसते. यामुळे त्याने डोकं लढवून चोरी केली आहे.

शॉपिंग बंद शॉपमध्ये फिरला. त्यानंतर दुकानातून दागिने चोरले आणि काही कॅश घेतली. नंतर मात्र त्याला सुरक्षारक्षकाने बघितले आणि सगळं प्लॅन फसला. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवले आहे. या व्यक्तीवर दुसऱ्या काही मॉलमधून वस्तू चोरल्याचा आरोप आहे.

तसेच घरफोडी आणि चोरीचा आरोप आहे आणि त्याला या सर्व प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. मात्र त्याच्या चोरीच्या पद्धतीमुळे त्याची चर्चा सुरू आहे. अनेकांनी त्याच्या डोक्याचे कौतुक देखील केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---
WhatsApp Group