राज्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात येत्या २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुरुवातीची पिके जळून गेली आहेत. आता अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यामुळे हवामान खात्याने येत्या २ ते ३ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबरच्या कालावधीत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे. मराठवाडयात दिनांक ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. सध्या हीच शेवटची अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे.