एका व्यक्तीने मोक्ष प्राप्तीसाठी जिवंतपणीत आपल्या मृत्यूची तयारी केली. या व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला. वृद्धांने मरणाची वेळ सांगितली. यानंतर नातेवाईकांनी निरोपाची तयारी केली. असे असताना मात्र, ऐनवेळी भलतचं काही तर घडलं, ही धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे.
विशेष म्हणजे येथे पोलिस देखील यावेळी उपस्थित होते. हिंगोलीत खुलेआम अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात आहे. यामुळे या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. येथील लिंबी गावात राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने आपल्या मृत्यूची वेळ कुटुंबियांना सांगितली.
त्यानंतर गावात अक्षरशहा अंधश्रद्धेचा बाजार मांडला. धोंडबाराव देवकते हे धार्मिक वृत्तीचे असून ते नेहमीच खरं बोलत असतात असा दावा गावकऱ्यांनी केले आहे. यामुळे आता देखील ते खरच सांगत आहेत, असे म्हटले जाऊ लागले. मात्र धक्कादायक प्रकार समोर आला.
याबाबत ते म्हणाले, आपल्याला साक्षात्कार झाला असून गजानन महाराजांच्या प्रकट दिनी दुपारी 2 वाजून 54 मिनिटांनी मला मोक्ष मिळणार आहे. माझ्या मरणाची तयारी करा, नातेवाईकांना बोलावून घ्या, भजन कीर्तन फराळ पाण्याची सोय करा असे देवकते यांनी सांगितले.
यामुळे सगळ्यांनी तयारी केली. सर्व नातेवाईकांना बोलावून घेतलं. भजनी मंडळी, नातेवाईक यांना बोलवून घेतले, पंचक्रोशीत टाळ मृदुंग लाऊन भजन सुरू होते. पोलिसांनीही उपस्थिती लावली. मात्र याबाबत कोणीही विचारणा केली नाही.
पण त्यांनी दिलेली दुसरी ही वेळ निघून गेली असून धोंडबाराव देवकते यांचा साक्षात्कार फोल ठरला. देवकते यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी यामुळे फक्त अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचे समोर आले. यामुळे याचा तपास करण्याची मागणी होत आहे.