पुण्यातील प्रसिद्ध रविवार पेठेत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याठिकाणी ही महिला तीन दिवस उपाशी होती.
दरम्यान, सासरचे लोक तिचा छळ करत असल्याचा आरोप केला जात आहे. नवऱ्याने तिला घरातून हाकलून दिले होते. त्या तीन दिवस सोसायटीच्या जिन्यात राहत होत्या. त्यांना जेवणही देण्यात आले नव्हते. सुलभा सुरेंद्र पुजारी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी पती सुरेंद्र रवींद्र पुजारी, दीर समीर, सासू रजनी यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुलभा यांचा भाऊ रवी वाघे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
महिलेला तीन दिवसांनंतर घरात न घेतल्याने तिने आत्महत्या केली. सुलभा यांनी जिन्याच्या शेजारी असलेल्या खिडकीला दोर बांधून गळफास घेतला. यानंतर त्यांच्या भावाने याठिकाणी धाव घेतली. तसेच चौकशी केली. यावेळी त्यांना एकच धक्का बसला.
चौकशीत सुलभा यांचा छळ करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर रवी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत पोलीस तपास करत असून या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
त्यांच्यात सतत वाद होत असल्याचे सांगितले जात असून सासरचे त्यांना सतत त्रास देत होते. यामुळे याच वादातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.