Hyderabad news : आधी दोन्ही मुलांना संपवलं, नंतर पती पत्नीने केली आत्महत्या, घटनेने उडाली खळबळ…

Hyderabad news : हैदराबादमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या घरात कुटुंबाने विष घेत टोकाचे पाऊल उचलले आहे.

याबाबत माहिती अशी की, पती, पत्नीने आधी मुलांना विष पाजले आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी रात्री कुटुंबाने आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटली आहे. यामध्ये सतीश (पती), वेधा (पत्नी), निशिकेत आणि निहाल अशी त्यांची नाव आहेत.

यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सतीश आणि वेधा दोघेही सॉफ्टवेअर कर्मचारी होते. मुलांच्या आजारपणामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुलांना आरोग्यासंबंधी समस्या होत्या असे समोर आले आहे. मुलं मानसिकरित्या स्थिर नव्हती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र काही फरक नव्हता, यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, निशिकेतला जन्मापासूनच ऑटिझमचा त्रास होता. तसेच निहालला काही काळापासून ऐकण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. जोडप्याने त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च केले होते. मात्र काही उपयोग झाला नाही.