---Advertisement---

तू कमावतेस तेवढे तर मी एका रात्रीत…! मराठी अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ अनुभव

---Advertisement---

अभिनेत्री अनुजा साठे हिने एका मुलाखतीत एक वेगळा अनुभव सांगितला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. तिने ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

यामध्ये तिने साकारलेली भूमिका एका स्त्रीच्या आयुष्याची खरी कथा होती. या सिरीजची तयारी करत असताना अनुजाला बारमध्ये नेण्यात आले होते. यावेळी घडलेला प्रसंग तिने सांगितला आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो. ते म्हणाले इथे तू बोल कुणाशीही. तिथल्या बारबालेशी जवळजवळ मी १ तास गप्पा मारल्या. 

यावेळी, ती मला म्हणाली तू मला कधीही फोन कर. तुला काहीही मदत लागली तर बिनधास्त फोन कर. ती म्हणाली, मी तर तुमच्या इंडस्ट्रीत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून पण काम केलंय. पण किती पैसे कमावतेस तू?’ असा प्रश्न झाल्यानंतर वातावरण थोडं शांत झाल.

अनुजा म्हणाली, मी गप्प होते. ती बोलली किती? ५० हजार, ६० हजार, १ लाख, २ लाख. मी एका रात्रीत कमावते. मग मी का माझं लाइफ बदलू. हे बोलत असताना तो एक मास्क होता. फक्त हे दाखवायला की आम्ही किती कणखर आहोत.

याबाबत ती म्हणाली, माझं तर घर आहे मीरा रोडला. त्यांना त्यांचा अभिमान आहे कारण ते स्वतःचं घर उभं करतात. पण ते जे करतायत त्याचा त्यांना अभिमान नाहीये.

त्या दिवशी मी हलले. आम्ही ताबडतोब निघालो. आपण हे कल्चर पाहिलं नाहीये असं नाही. चित्रपटात वगरे आपण पाहतो, हे पण त्याची खोली किती आहे हे मला तेव्हा कळलं. याचा कुठेतरी परिणाम होतो, असेही तिने म्हटले आहे.

दरम्यान, हे सांगतानाही अनुजाच्या अंगावर काटा उभा राहिला होता. ती प्रचंड भावनिक झाली होती. यावेळी तिने अनेक गोष्टी सांगितल्या. दरम्यान, अनुजाने ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---