‘गणपती बघायला गेला तर मी जीव देईल’, पत्नी पतीला भीती दाखवायला गेली अन् घडलं भयानक…

पतीला भीती दाखवण्याच्या नादात एका पत्नीचा जीव गेल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला गळफास घेण्याचा प्रयत्न करणं महागात पडला असून, यात खरोखरच गळफास बसल्याने महिलेचा जीव गेला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, महिला आणि तिचा पती बामणी गौरी सणानिमित्त गावी आले होते. यावेळी पतीने गणपती बघण्यासाठी बाहेर जातो, असे सांगितले. मात्र पत्नीने विरोध केला. यामुळे पत्नी संतापली.

बाहेर गेल्यास मी फाशी घेईल असे पत्नी म्हणाली. पण पतीने हसत घे फाशी म्हणत घरातून निघू लागला. पतीच्या मनात काहीही नसताना पतीला भीती दाखवण्यासाठी तिने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत नवऱ्याला असे काही घडेल याचा कसलाच अंदाज नव्हता.

यावेळी खरोखरच गळफास बसला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. सायलीने पतीस भीती घालण्यासाठी घरामध्येच महालक्ष्मीच्या समोरच गळफास गळ्यास अडकविल्याने तिचा त्यातच जीव गेला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कावी येथे ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत तपास सुरू आहे. सायली रामभाऊ काठमोरे असे मयत महिलेचे नाव आहे.

पंचनामा करून मयत सायलीचे शवविच्छेदन जिंतूर येथील शासकीय दवाखाना येथे करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बामणी पोलीस ठाण्याचे सपोनि कृष्णा घायवट यांनी घटनास्थळी धाव घेतली.