IAS अधिकाऱ्याच्या बायकोचे गँगस्टरशी अफेअर, घरासमोरच केली आत्महत्या, उडाली खळबळ…

गुजरातमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने शनिवारी विषप्राशण केलं, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी भयंकर माहिती समोर आली आहे. तिचे गँगस्टरशी अफेअर असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातच्या एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने घरासमोरच विष प्राशण करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाद-विवाद सुरु होते.

त्यांनी आधी वेगळं होण्याचा निर्णय देखील घेतला होता. ते एकत्रही राहत नव्हते. त्यानंतर ती अचानक घरी आली. जेव्हा तिला घरात घेण्यास नकार देण्यात आला तेव्हा तिने घरासमोरच विष प्राशन केले. यामुळे तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

४५ वर्षीय सूर्या जे असे या महिलेचं नाव आहे. ती तमिळनाडूची रहिवासी होती आणि तिथल्याच एका गँगस्टरसह पळून गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आयएएस पत्नी सूर्याने नऊ महिन्यांपूर्वी पतीला सोडले होते. ती गँगस्टरसोबत रिलेशनशीपमध्ये होती.

त्यांचे संबंध नवऱ्याला समजले होते. गेल्या आठ महिन्यांपासून ती गुजरातमध्ये नव्हती. दरम्यान, आयएएसने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगितले होते. यामुळे ते कायदेशीर वेगळेच होणार होते. जेव्हा सूर्या सासरी परतली तेव्हा तिला घरात येण्यासही नकार देण्यात आला. त्यानंतर तिने पतीच्या घराबाहेरच विषप्राशण केले.

दरम्यान, १४ वर्षांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक टाळण्यासाठी सूर्या तिच्या पतीच्या घरी गेली असावी, अशी पोलिसांकडून माहिती मिळत आहे. सूर्याचं नाव तिच्या कथित गँगस्टर बॉयफ्रेंड ‘हायकोर्ट महाराजा’सोबत अपहरण प्रकरणात पुढं आलं होतं. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती. यामुळे तिच्या अडचणी वाढल्या होत्या.