ICICI Bank Scam : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याठिकाणी आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
या शाखा व्यवस्थापकावर मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याने ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. एसपी अमित कुमार यांच्या नेतृत्वाखालील तपासात या घोटाळ्याचे सत्य समोर आले. या प्रकरणात बँक शाखा व्यवस्थापक आणि त्यांची टीम त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढायचे.
नवीन FD चालू आणि बचत खाती उघडण्याच्या बहाण्याने त्यांना पैशांचा वापर केला गेला. जेव्हा एका व्यक्तीला गैरकृत्य समजले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तेव्हा खेळ बदलला. यामुळे हे प्रकरण सर्वांच्या पुढे आले आहे.
दरम्यान, ब्लॅकमेलरला पैसे देण्यासाठी ग्राहकांच्या खात्यातून अधिक पैसे काढले. ब्लॅकमेलर उदयपूरचा असून उदयपूर येथील एका व्यक्तीला सुमारे अडीच कोटी रुपये देण्यात आले. मॅनेजर आणि त्यांची टीम एफडीवर ओव्हरड्राफ्ट करायचे, मग ते पैसे नवीन खाती उघडण्यासाठी वापरायचे. यामुळे हे प्रकरण समजत नव्हते.
नंतर काही दिवसांनी ते बंद झाले, त्यानंतर हे पैसे मूळ खात्यात जमा करण्यात आले. असा गैरव्यवहार अनेक वर्षांपासून सुरू राहिला. याबाबत माहिती झाल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला असून याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ज्या लोकांची या बँकेत खाती होती, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे याबाबत अनेकांनी चौकशी करण्यात सुरू केली होती. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.