अकोल्यात जन्मदात्या आईनेच केली पोटच्या पोराची हत्या; आईने हत्येमागचे कारण सांगताच पोलिसही हादरले

आपल्या जन्मदात्या आईनेच मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आळंदा फाट्यानजीक बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी त्वरीत घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

पोलिसांनी अधिकचा तपास केला असता मयत शांताराम हा अविवाहीत व व्यासनाधीन होता व घरी नेहमी त्याच्या आईला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा, अशी माहिती पुढे आली. यामुळे त्याला आई वैतागली होती. यामुळे झोपेत असताना जन्मदात्या आईनेच त्याच्या डोक्यावर दगडी पाटा मारला.

त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर आईने एका परिचिताच्या मदतीने शांतारामचे प्रेत घरातील गोधडीत बांधले व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता रात्रीच दुचाकीने निघाले. मात्र सोबतची व्यक्ती निघून गेली. नंतर शांतारामची आईने प्रेत तेथेच ठेवून घरी आली.

याबाबत पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे म्हणाले की, सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबड उडाली होती. मात्र, बार्शीटाकळी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात गुन्ह्याचा छडा लावला. नंतर तपासाला गती मिळाली.

दरम्यान, या हत्या प्रकरणात एकूण दोन आरोपी आहेत. एका आरोपीस अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. याबाबत त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे.