नाशिकमध्ये जन्मदात्या बापानेच सुपारी देऊन काढला मुलाचा काटा; धक्कादायक कारणही आले समोर

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाची सुरू असलेली गावगुंडी, सतत मद्यपान करणे आणि घरात आई-वडिलांना होणारी मारहाण असह्य झाल्यामुळे जन्मदात्या बापानेच मुलाचा काटा काढल्याची घटना घडली आहे.

पित्याने 70 हजार रुपये सुपारी देऊन त्याला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांसह आणखी दोघांना अटक केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. मुलाकडून सतत मद्यपान करून गावात गावगुंडी करणे व घरात देखील आई-वडिलांना नेहमीच मारहाण करण्याचे प्रकार सुरू होते.

यामुळे त्याच्या या वागण्याला घरातले आणि गावातली मंडळी वैतागलेली होती. नंतर पास्ते शिवारातील बंद पडलेल्या स्फोटक कंपनीच्या मीटर हाऊसमध्ये राहुल मृत अवस्थेत पडलेला असल्याचे सिन्नर पोलिसांना समजले. याबाबत तपास करण्यात आला.

पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धावव घेतली. मुलाच्या वाईट प्रवृत्तीमुळे जन्मदात्या बापानेच त्याला सुपारी देऊन संपवण्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

याबाबत शिवाजी आव्हाड यांनी गावातीलच वसंता अंबादास आव्हाड आणि विकास शिवाजी कुटे या दोघांना राहुलला ठार मारण्याची सुपारी दिली होती. तपासानंतर मात्र सगळेच हादरून गेले होते.

दरम्यान, येथील एका खोलीत गळा आवळून फाशी दिलेल्या अवस्थेत राहुलचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. तसेच याठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या देखील असल्याने पोलिसांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसा तपास देखील पोलिसांनी केला.  

लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत आवाड हा राहुलला दारू पिण्याच्या बहाण्याने एका बंद कंपनीत घेऊन गेला. दारू पिऊन तिघांनीही राहुलचा कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केला आणि दोघेही तेथून पळून गेले. वडील शिवाजी आवाड यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर सिन्नर पोलिसांनी तिघांना अटक केली.

दरम्यान, शनिवारी राहुल दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आई-वडिलांना मारहाण केली. त्यावेळी आईला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या शेजारच्या महिलेवरही त्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. डोक्यावर दगड लागल्याने महिला कोमात गेली आहे.

या प्रकरणानंतर वडील शिवाजी आवाड यांनी मुलाविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याचा शोध घेत पोलीस गावात पोहोचल्याचे पाहून राहुल तेथून पळून गेला. राहुल हा नेहमी गावाला अपमानित करत असल्याने शिवाजी आवाड याने त्याच्या मित्रांना विश्वासात घेऊन त्याचा काटा काढण्यासाठी 70 हजार रुपये देण्यास सांगितले.