42 वर्षीय व्यक्तीने त्यांच्या आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन नंतर त्यांचा चेहरा प्लास्टिकच्या पिशवीत घालून निर्घृण हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
धनकवडी येथे गणेश मनोहर फरताडे हा आई निर्मला फरताडे यांच्यासह राहत होता. गणेश काम करत नव्हता, तसेच तो कर्जबाजारी झाला होता. गणेश हा इंजिनिअर होता. त्याची आई आजारी होती. असे असताना बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने हे कृत्य केले आहे.
त्याने आधी आईची हत्या केली. नंतर त्याने स्वतः आत्महत्या केली. त्याने औषधांचा ओव्हर डोस देऊन बेशुद्धावस्थेत असणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक पिशवी घालून खून केला. तसेच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकऱणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेमागे दुसरे अजून काही कारण आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत गणेशच्या मावस बहिणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कुटूंबाकडून माहिती घेतली जात आहे.
तो अनेक दिवसांपासून नैराश्यात गेला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पोलीस कसून तपास करत आहेत.