राज्यात मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. त्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी मनसेने तोडफोड किंवा इतर स्वरूपाचे आंदोलन करण्याऐवजी मनविसेच्या नगरच्या कार्यकर्त्यांनी येथील एका मनोविकार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतल्याचे पत्र अॅड. सदावर्ते यांना पाठवून एक फेब्रुवारीला नगरला येऊन उपचार घेण्याचे आवाहन अॅड. सदावर्ते केले आहे. यामुळे आता याचीच चर्चा सुरू आहे.
मनसे नेहेमी फोडाफोडीच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. पण आता अशा प्रकारे केलेल्या आंदोलनामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. अॅड. सदावर्ते यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर सतत टीका करीत आहेत.
यामुळे आम्ही नगरमधील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञांची वेळ घेतली आहे. १ फेब्रुवारीला अॅड. सदावर्ते तुमच्याकडे उपचारांसाठी येतील, असे पत्र डॉक्टरांना देण्यात आले आहे, असे मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमीत वर्मा यांनी म्हटले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, राज्यात एक वादग्रस्त व्यक्ती गुणरत्न सदावर्ते हे गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होऊन नैराश्यातून मनोरूग्ण झाल्याची माहिती सूत्रांनी आम्हाला दिली आहे. यामुळे त्यांच्यावर आपण योग्य उपचार करून त्यांना लवकर बरे करावे यासाठी त्यांची वेळ आपल्या दवाखान्यात आरक्षित असावी म्हणून विनंती करतो.
सदूकाका आपल्याकडे उपचारासाठी येतील अशी अपेक्षा आहे व आपण योग्य तो उपचार करून त्यांना लवकर बरे करावे, ही विनंती, असेही यामध्ये म्हटले आहे. यामुळे आता सदावर्ते याला काय उत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.